कोथरुड परिसरातील दोन सराईत तडीपार

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन- कोथरुड परिसरातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील दोघांना पुणे शहर, जिल्हा व पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या परिक्षेत्रातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ तीनचे उपायुक्त मंगेश शिंदे यांनी दिले आहेत.

पवन तुकाराम कुडले (२१, दत्तनगर सुतारदरा) व तेजस दत्ता कोंढाळकर (२२, सुतारदरा) अशी दोघांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन कुडले व तेजस कोंढाळकर हे दोघे सराईत गुन्हेगार असून खुनाचा प्रयत्न करणे, मारामारी  करणे, घातक शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांची परिसरात दहशत असल्याने त्यांच्याविरोधात तक्रार देण्यास कोणीही पुढे  येत नव्हते. म्हणून परिमंडल तीनचे उपायुक्त मंगेश शिंदे यांनी त्यांना पुणे शहर, जिल्हा दोन वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. तरी ते तडीपार कालावधीत दिसून आल्यास नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.