अबब ! आरेतील वृक्षतोडीवर ‘वारेमाप’ खर्च, एक झाड तोडण्यासाठी तब्बल ‘एवढे’ रूपये, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीआधी भाजप सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेट्रोसाठी आरेमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. रात्रीतून झालेल्या झाडांच्या कत्तलीवर मोठी टीकाही झाली. यावर पर्यावरणप्रेमींनी उत्स्फुर्तपणे मोठे आंदोलनही केले. मात्र, आता या वृक्षतोडीबाबत माहिती अधिकारातून धक्कादायक बाब पुढे आली आहे.

4 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान ऐकून 2 हजार 11 झाडे तोडण्यात आली. या सर्व कामासाठी ऐकून 2 कोटी 70 लाख 16 हजार 898 रुपये खर्च आला. म्हणजेच प्रत्येक झाड तोडण्यासाठी खर्च 13 हजार 434 रुपये इतका आला.

माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी माहितीच्या अधिकारात याबाबत विचारणा केली असता ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

वृक्षतोडीवर अमाप खर्च
एखादे झाड जगवण्यासाठी वर्षाला किमान 3 हजार रुपये खर्च येतो असे तज्ञांचे मत आहे. तर मग आता झाडे तोडण्यासाठी एवढा अमाप खर्च नेमका का केला गेला आणि याने काय साध्य झाले असा सवाल उपस्थित केला जात आहे.

माहिती देण्यासाठी होत होती टाळाटाळ
माहिती अधिकारात देखील माहिती मिळवताना खूप उशीर झाल्याचे भंडारे यांनी सांगितले. एमएमआरसीला हा अर्ज 15 ऑक्टोबरला प्राप्त झाला. मात्र 9 डिसेंबरला रोजी त्याचे उत्तर देण्यात आले. ते ही भंडारे यांनी मुदत संपूनही माहिती न मिळाल्याने अपील केले होते. मिळालेल्या पत्रावर 11 नोव्हेंबर तारीख होती त्यामुळे इतक्या उशिरा उत्तर देऊनही तारखेत असा घोळ का हे स्पष्ट व्हावे अशी मागणी यावेळी भंडारे यांनी केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like