CRPF च्या जवानांमध्ये गोळीबार, 2 अधिकारी ठार

रांची : वृत्तसंस्था – झारखंडमध्ये सीआरपीएफच्या जवानांमध्ये झालेल्या गोळीबारात दोन अधिकारी ठार झाले, तर अन्य दोन सैनिक जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांपैकी एका सैनिकानेच हा गोळीबार केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र घटनेमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

बोकारो येथे सीआरपीएफच्या 226 व्या बटालियनच्या ‘चार्ली’ कंपनीत सोमवारी रात्री सीआरपीएफच्या जवानांमध्ये सोमवारी गोळीबार झाला. यात सहायक कमांडंट रँकच्या एका अधिकाऱ्याचा आणि एका सहायक उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला आणि दोन सैनिक जखमी झाले.

झारखंडमध्ये दोन टप्प्यांतील निवडणुका पार पडल्या आहेत तर निवडणुकांचे आणखी तीन टप्पे होणं अद्याप बाकी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) ची 226 व्या बटालियनची तुकडी राज्यात निवडणुकांच्या कर्तव्यावर होती. तेव्हा ही घटना घडली आहे. सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी आणि राज्य पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like