येत्या 24 तासात मुंबई-पुण्यासह ‘या’ भागात पाऊस, अरबी समुद्रात एकदाच 2 वादळांचं ‘सावट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई, पुणे नाशिक भागात उद्या पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कामेटनं वर्तवला आहे. अरबी समुद्रात पुन्हा एकदा एकाच वेळी दोन चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता आहे. पवन आणि अम्फन अशी या वादळांची नावे आहेत. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या 24 तासांत चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्व यंत्रणांनाही सतर्क करण्यात आलं आहे.

अरबी समुद्रात मध्यंतरी क्यार आणि महा ही चक्रीवादळं निर्माण झाली होती. यानंतर पुन्हा एकदा तशीच परिस्थिती अरबी समुद्रात निर्माण झाली आहे. चक्रीवादळाबद्दल बोलायचं झालं तर या वर्षी अरबी समुद्रात 4 तर बंगालच्या उपसागरात 3 चक्रीवादळांची निर्मिती झाली आहे. अशात आता अरबी समुद्रात आणखी दोन चक्रीवादळं निर्माण होत आहेत. ही परिस्थिती खूप दुर्मिळ मानली जाते.

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1202213782732378112

दरम्यान पवन आणि अम्फन ही दोन्ही चक्रीवादळं एकाच वेळी येण्याची भीती आहे. यातील पवन चक्रीवादळ सोमालियाच्या दिशेनं मार्गक्रमण करणार आहे. आधी ते उत्तर पश्चिम दिशेला आणि नंतर ते पश्चिम दिशेला हे वादळ पुढे सरकणार आहे असा अंदाज वर्तवला जात आहे. अम्फन वादळाबद्दल बोलायचं झालं तर हे वादळ पूर्व मध्य अरबी समुद्रात घोंघावत आहे. याच वादळाचा परिणाम म्हणून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि दक्षिण गुजरातच्या विविध भागात येत्या 24 तासांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वादळादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका असेल असा अंदाजही स्कायमेटनं वर्तवला आहे. याशिवाय महाराष्ट्र आणि गुजरातमधील समुद्र या काळात खवळलेला राहणार आहे.

Visit : Policenama.com