काळाचा घाला ! ‘फुटपाथ’वर झोपलेल्यांना टँकरने ‘चिरडले’ ; २ महिलांचा जागीच मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील विक्रोळी येथे रस्त्यावरील फुटपाथवर झोपलेल्यांना टँकरने चिरडले. त्यात दोन महिलांचा जागीच मृत्यु झाला असून एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. विक्रोळी येथील कैलास कॉम्प्लेक्स टिम्बकटु हॉटेलजवळ फुटपाथवर शनिवारी रात्री साडेनऊ वाजता हा प्रकार घडला.

कैलास कॉम्प्लेक्सजवळील फुटपाथवर एकाच कुटुंबातील चौघे जण झोपले होते. टँकरचालक टँकर पार्क करीत असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. हा टँकर दुसऱ्या टँकरला जाऊन आदळला. त्यात झोपलेले तिघे जण टँकरखाली चिरडले गेले. त्यात दोन महिलांचा जागीच मृत्यु झाला. जखमी मुलगा व एक पुरुष यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like