मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, २ ठार

पेण : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-गोवा मार्गावर कर्नाळा खिंडीत झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. कर्नाळा खिंडीत एच पी गॅस टँकर आणि अल्टो कारचा अपघात झाला. अपघातात अल्टोकारमधील दोघांचा जगीच मृत्यू झाला तर तीनजण जखमी झाले.

भरधाव वेगात जाणाऱ्या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील पाच जणांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीनजण जखमी झाले. मृत आणि जखमी हे झोंबाडी गावचे रहिवाशी आहेत.

टँकरने धडक दिल्याने अल्टो गाडीला अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की अल्टो गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे खिंडीतील वाहतूक काही वेळा करीता मंदावली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like