भोकर ग्रामीण रुग्णालय परिसरात आढळून आले मृत अर्भक

भोकर : पाेलीसनामा ऑनलाईन (माधव मेकेवाड) नांदेड जिल्ह्यात घडलेली हृदय द्रावक घटना भोकर येथील शासकिय ग्रामीण रुग्णालय परिसरात एक दिवसापुर्वी जन्मलेले पुरुष जातीचे मृत अर्भक सापडले असून या प्रकरणी अज्ञात माता पित्याविरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकिय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे परिचारक कर्तव्यावर असलेले निलेश पाचभाई हे दि.१८ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास रुग्णालयात जात असतांना ग्रामीण रुग्णालय परिसरात दोन डूकरे काहीतरी ओढत आणून खात असतांना त्यांना दिसले.त्या डूकरांना त्यांनी हुसकावले व जवळ जाऊन पाहिले असता ते एक मृतअवस्थेतील अर्भक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

ही माहिती त्यांनी कर्तव्यावर असलेले वैधकिय अधिकारी डाॅ.समद यांना सांगीतली. यावरुन त्यांनी भोकर पोलीसांना ती माहिती कळवली घटनास्थळी त्यांना बोलावुन यावेळी पो.उप.नि.सुशिल कुमार चव्हाण,पो.उप.नि.सय्यद शरफोद्दीन व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली व  परिचारीकां समक्ष रितसर पंचनामा केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या मृत अर्भकाची शिच्छेदन केले असता त्यांनी ते पुरुष जातीचे असून एक-दोन दिवसापुर्वी जन्मलेले असावे असा प्राथमिक अभिप्राय दिला.

सदरील अर्भकाचा एक पाय व एक हात डूकरांनी खाऊन टाकल्याने त्याची अतिशय दुरावस्था झाली होती. या प्रकरणी परिचारक निलेश पाचभाई यांनी दिलेल्या माहितीवरुन अज्ञात माता पित्याविरुद्ध भोकर पोलीसात भादविच्या कमल ३१८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या अर्भकाचा पोलीसांनी दफनविधी पार पाडला आहे. तर पो.नि.आर. एस.पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.सय्यद शरफोद्दीन, जमादार एस हनवते हे पुढील अधिक तपास करत आहेत. ‘त्या’अभ्रकाच्या माता पित्याविरुद्ध परिसरातून संताप व्यक्त होत आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.