२ महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे ‘हरियाणवी’ गाण्यावर ‘ठुमके’, ‘TikTok’वर व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या प्रत्येकावरच टिक-टॉकने जादू केल्याचे दिसून येत आहे. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकजण व्हिडिओ तयार करून एका रात्रीत चर्चेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रशासनाकडून काही जणांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. असे असताना देखील पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोक्यातील टिक-टॉकची नशा काही उतरायला तयार नाही. गुजरातनंतर दिल्ली महिला पोलिसांचा टिक-टॉक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला पोलीस कर्मचारी गणवेशामध्ये दिसत आहेत. त्या हरियाणाचे प्रसिद्ध गायक अजय हूडा यांचे गाणे ‘बटुआ से मुंह लेरी पतली कमर’ या गाण्यावर ठुमके लगावताना दिसत आहेत. गाण्यावर डान्स करताना त्यांच्या पाठिमागे दिल्ली पोलिसांचे बॅरिगेट दिसत आहेत. मात्र हा व्हिडिओ दिल्लीतील कोणत्या ठिकाणचा आहे याची माहिती मिळू शकली नसली तरी सोशल मीडियावर या दोघींचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मागील काही दिवसांपूर्वी गुजरात मधील मेहसाणा येथील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पोलीस ठाण्यातील टिक-टॉक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत महिला कर्मचारी पोलीस ठाण्यात डान्स करताना दिसत होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी शिस्तीत राहिले पाहिजे असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. तसेच कर्तव्यावर असताना अशा प्रकारचा व्हिडिओ बनवणे म्हणेजे शिस्तीचे उल्लंघन केल्यासारखे असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले होते.

आरोग्यविषयक वृत्त