सांगली जिल्ह्यात वीज अंगावर पडून 2 शेतमजूर ठार

सांगली/विटा : पोलीसनामा ऑनलाइन –खानापूर तालुक्यातील घाडगेवाडी येथे अंगावर वीज पडून दोन शेतमजूरांचा मृत्यू झाला. ही घटना आज (रविवार) दुपारी एकच्या सुमारास घडली. सिद्धराम भिमराव जगदाळकर (वय-27 रा. सुरगाई. ता. सिंदगी, जि. विजापूर) आणि मल्लू (पूर्ण नाव समजू शकले नाही वय-25) असी मृत झालेल्या दोन शेतमजूरांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जगदाळकर हा महादेव कृष्णा घाडगे यांच्याकडे तर मल्लू हा अंकुश बापू घाडगे यांच्याकडे शेतमजूर म्हणून काम करत होते. आज सकाळी दोघेजण म्हसोबाच्या डोंगरावर जनावरे चरण्यासाठी घेऊन गेले होते. दुपारी बाराच्या सुमारास वीजेच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे ते दोघे एका झाडाखाली आडोशाला थांबले होते. त्याचवेळी दोघांच्या अंगावर वीज पडली. यामध्ये होरपळून दोघांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच गावकामगार तलाठी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान, कुर्ली आणि घाडेगावाडी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून मल्लू हा एक आठवड्यापूर्वीच गावामध्ये कामासाठी आला होता. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like