कर्जबाजारीपणामुळे हतबल झालेल्या दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बीड जिल्ह्यातील सततच्या नापिकी, दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. बीड जिल्ह्यात घडणाऱ्या सततच्या आत्महत्या यांचे प्रमाण कमी न होता वाढतच चालले आहे आणि ही अतिशय चिंताजनक बाब आहे. वडवणी तालुक्यातील देवडी येथील नागेश भिकाजी नाईकवाडे (२५) आणि धारूर तालुक्यातील योगेश किशन राठोड (२०) या दोन तरुणांनी स्वतःच आयुष्य संपवलं.

नागेश नाईकवाडेवर काहीच हजारांचं कर्ज होतं व ते त्याला फेडणे शक्य नव्हते. अवकाळी पाऊस, मालाला असलेला कमी भाव तसेच नापिकीने त्रस्त असलेला नागेश सकाळी सहा वाजता शेतात गेला असता विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले. नागेशच्यामागे पाच भाऊ, एक बहीण, आईवडील असा परिवार आहे.

अगदी अशीच घटना धारूर तालुक्यातील मोहखेड धनखिळा तांडा येथे घडली. योगेश किशन राठोड हा २० वर्षाचा तरुण आर्थिक संकटाला कंटाळून गळफास घेऊन स्वतःच आयुष्य संपवलं त्याचे आंबेजोगाई येथे बी.एस.सी. चे शिक्षण सुरु होते. गेल्या वर्षी मनाजोगे पीक न आल्याने कॉलेज सोडून उसतोडणीला जावे लागले म्हणून पुन्हा तेच उपभोगावे लागते कि काय? तसेच दारिद्र्याला कंटाळून गळफास घेऊन जीवन संपवलं.

आरोग्यविषयक वृत्त