थरार ! ‘जिगरबाज’ अग्नीशमन दलाच्या जवानांनी मृत्यूच्या दारापर्यंत गेलेल्या 2 मच्छीमारांचा वाचवलं (व्हिडीओ)

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – देशामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे महापुराची संकट उभे राहिलेले आहे. सर्वच ठिकाणी पुरामुळे हाहाकार माजलेला आहे. केरळ,हिमाचल प्रदेश , काश्मीर अशा अनेक ठिकाणी काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. कालच काश्मीरमध्ये पूर परिस्थितीमुळे नदीकाठी अडकलेल्या दोन नागरिकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने वाचवण्यात आलं होत.

भोपाळमध्ये सुद्धा अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर आलेला आहे, केरवा डॅम येथे अडकलेल्या दोन मच्छीमारांना महानगरपालिका आणि अग्निशामक दलाने चित्तथरारक पद्धतीने वाचवले आहे.

केरवा डॅमचे पाणी अचानक वाढल्याने दोन मच्छीमार डॅमच्या दुसऱ्या टोकाला अडकलेले होते, पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की,पाण्यात पाय जरी ठेवला तरी माणूस जोरात वाहून दुसऱ्या टोकाला जाईल. अशा वेळेस अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे शिडी टाकली आणि त्या मच्छीमारांचे प्राण वाचवले.

यावेळी पाण्याची पातळी इतकी वाढली होती की मच्छीमारांना शिडी वरून रांगत रांगत एका टोकाहून दुसऱ्या टोकाला जावे लागले या बाबतचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –