home page top 1

कर्जत तालुक्यामध्ये नदीत बुडून दोन मैत्रिणींचा मृत्यू

कर्जत : पोलीसनामा ऑनलाईन

कर्जत तालुक्यातील कळंब या ठिकाणी आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन मैत्रिणींचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (रविवार) सकाळी घडली.

मायरा सर्फराज पटेल (वय -९) आणि तय्याबा सुहेल ताडे (वय-७) अशी या मुलींची नावे आहेत.
[amazon_link asins=’B0725W7Q38′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’362f6210-a3ab-11e8-9d9e-8da9c3e82992′]
रविवारची सुट्टी असल्याने मायरा आईसोबत कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती. यावेळी तिची मैत्रीण तय्याबाही तिच्यासोबत होती. आईची नजर चुकवून मायरा व तय्याबा पाण्यात उतरल्या. पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या. यामध्ये दोघींचा मृत्यू झाला.

दरम्यान,  दोन्ही मुली आपल्याला नदीवर सोडून पुन्हा घरी गेल्या असाव्या असे त्यांचा आईला वाटले. कपडे धुवून झाल्यानंतर आई घरी गेली. मात्र  दोन्ही मुली घरी आल्याचं नसल्याचं तिला समजले. त्यानंतर घरातल्यांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. नदीवर या दोघी  गेले असल्याने प्रथम त्यांनी नदीवर ह्या दोघींचा शोध घेतला. तेंव्हा या दोघी नदीच्या दगडांच्या कपारीमध्ये मृतावस्थेत आढळल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी दोन्ही बहिणींचे मृतदेह पाण्याबाहेर काढले.

Loading...
You might also like