क्षुल्लक कारणावरून दोघांनी केला मित्राचा खून

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. असाच एक भयंकर खूनाचा प्रकार समोर आला आहे. दोन मित्रांनी क्षुल्लक कारणावरून मित्रावर चाकूने वार करुन खून केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री मित्रानेच मित्राचा खून केला आहे. पंकज गोकूळ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे धीरज विश्वासराव ठाकरे आणि सागर खरड अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे धीरज आणि सागरने पंकजला चाकूने भोसकले. यावेळी इतर मित्रांनी पंकजला तात्काळ नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तिथे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली.

धीरज आणि सागरने पंकजला भेटण्यासाठी शोभानगर इथल्या एका पानटपरीवर बोलावले होते. तिथे त्यांच्यामध्ये काही मुद्द्यांवरून बाचाबाची झाली. यामध्ये पंकजने ’तू खूप मोठा झालास का?’ असा आवाज चढवला. यावर रागात येत धीरज आणि सागरने पंकजला चाकूने सपासप वार केले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंकजचा मृतदेह ताब्यात घेतला घेतला.