धक्कादायक ! ‘लुडो’ गेम हरलेले 50 रुपये न दिल्याने दोन मित्रांकडून तरुणाचा खून

अमृतसर : वृत्तसंस्था – लुडोत हरलेले 50 रुपये न दिल्याने दोन मित्रांनी साथिदाराच्या मदतीने मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना अमृतसरमध्ये घडली आहे. लुडोत हरलेल्या पैशावरून तीन मित्रांमध्ये वाद झाल्यानंतर हा प्रकार घडला. आरोपींनी त्यांच्या मित्रला दारू पिण्याच्या बहाण्यान घेऊन गेले. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. खून करून त्याचा मृतदेह घरापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या एका खड्ड्यात फेकून दिला.

ही घटना 14 जुलै रोजी घडली असून 4 दिवसांनी मृतदेह सापडला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईना सोपवण्यात आला. सुखजिंदर सिंह असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेदिवशी सुखजिंदर हा त्याचे मित्र विशालदीप सिंह आणि मनीसोबत एका ई-रिक्षात लुडो खेळत होते, अशी माहिती त्याचा भाऊ अवतार सिंह ने दिली. सुखजिंदर हा लुडोमध्ये 50 रुपये हरला. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. यानंतर विशाल आणि मनीनं सुखजिंदरला मारहाण केली. त्यामुळे सुखजिंदरनं विशाच्या ई-रिक्षाची काच फोडली. यानंतर त्यांच्यातील वाद मिटला होता.

यानंतर आरोपीचे आणखी काही मित्र तिथे आले. ते सुखजिंदरला दारू पिण्याच्या बहाण्याने घेऊन गेले, अशी माहिती अवतार सिंह याने दिली. सुखजिंदर हा घरी परतला नसल्याने त्याने आसपासच्या भागातील सीसीटीव्ही तपासले. त्यात आरोपी सुखजिंदरला जबरदस्तीने ई-रिक्षामध्ये बसवून नेत असल्याच दिसून आले. त्यानंतर अवतार सिंह याने आपला भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी त्याच रात्री गुरु तेग बहादूर नगर जवळील एका मोठ्या खड्यातून सुखजिंदरचा मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन अटक केली. आरोपींनी केवळ 50 रुपये दिले नसल्याने खून केल्याचे चौकशीत कबुल केले आहे.