घरफोडी करणाऱ्या दोन टोळ्या गजाआड, १२ गुन्हे उघडकीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर जिल्ह्यात दिवसा आणि रात्री घरफोड्या, जबरी चोरी करणाऱ्या दोन टोळ्यांना स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले. चोरट्यांनी शिर्डी, श्रीरामपूर, नेवासा, सोनई, शेवगांव परिसरात घोरफोड्या केल्या असून त्यांच्याकडून ११ घरफोड्या आणि १ जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

सागर उर्फ बबलू मोहन चव्हाण (वय-२६ रा. कमालपूर, ता. श्रीरामपूर मुळ रा. औरंगाबाद), अतिष सुरेश पवार (वय-२० रा. निमगांव कोऱ्हाळे, ता. राहाता), आण्णासाहेब गोरख गायकवाड (वय-३२ रा. नेवासा रोड, श्रीरामपूर), सुनिल उर्फ छगन देवराम पवार (रा. अशोकनगर, रा. परतूर, जि. जालना), तोहीन किरण पवार (वय-२० रा. निमगांव कोऱ्हाळे, ता. राहता मुळ रा. मध्यप्रदेश), बाबूल्या गोविंद साळुंखे (वय-२०  रा. राहता), दिलीप मोहन चव्हाण (वय ३५ रा. वडाळा महादेव, ता श्रीरामपूर) यांना अटक करण्यात आली आहे. तर खंग्या उर्फ विनोद विजय चव्हाण (रा. अशोकनगर, श्रीरामपूर), राजेश मोहन चव्हाण (रा. कमालपूर, श्रीरामपूर मुळ रा. औरंगाबाद) हे फरार आहेत.

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी घरफोडी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना  पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुन्ह्यातील आरोपीची माहिती मिळाली. घरफोडीचे गुन्हे खंग्या उर्फ विनोद चव्हाण याने त्याच्या इतर साथिदारांच्या मदतीने केले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी पथक तयार केले. पथकाने सागर उर्फ बबलू चव्हाणला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सांगितली. तसेच त्यांच्या मदतीने गुन्हे केल्याची कबुली दिली.

दरम्यान खंग्या उर्फ विनोद चव्हाण याने नगर जिल्ह्यात दीड महिन्यांपूर्वी घरफोडीचे गुन्हे केले असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने तीन गुन्हेगारांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी नेवासा, सोनई, श्रीरापूर, गंगापूर या ठिकाणी घरफोडी आणि जबरी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, रोहीदास पवार, शेगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, श्रीरामपूर विभागाचे राहूल मदने, शिर्डी विभागाचे सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार,पोलीस उपनिरीक्षक रोहन खंडागळे, सहायक फौजदार सोन्याबापू नानेकर, पोलीस कॉन्स्टेबल मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, सुनिल चव्हाण, संतोष लोंढे, रविंद्र कर्डीले, मल्लिकार्जुन बनकर,  दिगंबर कारखेले, आण्णा पवार, भागीनाथ पंचमूख, सागर सुलाने, कमलेश पाथरुट, योगेश गोसावी, रवि सोनटक्के, दत्ता हिंगडे, सचिन अडबल, दिपक शिंदे, मेघराज कोल्हे, चालक सचिन कोळेकर यांच्या पथकाने केली.