JCB मध्ये अडकलेले 2 विशालकाय अजगर सापडले

पोलीसनामा ऑनलाइन – ओडिसामध्ये एका जेसीबी मशिनमध्ये रविवारी सकाळी दोन विशालकाय अजगर अडकलेले सापडले. त्यानंतर या अजगरांचे रेस्क्यू करण्यात आलं. बेरहामपुर जिल्ह्यातील पल्लीगुमुला गावातील जलाशयाच्या सुशोभीकरणाच्या कार्यादरम्यान हे अजगर दिसून आले आहेत.

वन्यजीव अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १ अजगर ७ फुट लांब होता. तर दुसऱ्या अजगराची लांबी ११ फूट होती. दोन अजगरांपैकी एका लहान अजगराला वाचवायला लगेच यश आलं. तर दुसरा अजगर मशीनच्या आत सापडला व त्याला पकडण्यास अधिक वेळ लागला.

वन्यजीव अधिकारी आणि सर्पमित्राने पकडलेले ते चार तास बचाव कार्यानंतर दोन्ही अजगरांना जंगलात परत सोडण्यात आले. बचाव मोहिमेस मदत करणारे स्वतंत्र कुमार यांनी लिहिले की, ‘सर्प बचाव कार्यसंघाच्या पथकाला रविवारी सकाळी नऊच्या सुमारास एक फोन आला आणि सकाळी ९: ३० च्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सहज जेसीबी मशीनच्या वरच्या बाजूला असलेल्या एका अजगराची सुटका केली. पण ११ फूट लांबीचा दुसरा अजगर मशिनच्या आत होता. त्याला वाचविण्यासाठी चार तास लागले.’