अयोध्या: दोन तरुणींना झाले प्रेम, मंदिरात लग्नाची ‘व्यवस्था’

पोलिसनामा ऑनलाइन : असे म्हणतात की “प्यार में सब कुछ जायज है”. असेच एक प्रकरण अयोध्यामधून समोर आले आहे जेथे दोन युवतींनी आपापसात लग्न केले आहे. कानपूरची राहणारी मुलगी अयोध्याच्या साहिबगंज परिसरातील मावशीच्या घरी येत असे. याच काळात साहबगंज येथे राहणार्‍या दुसर्‍या मुलीवर प्रेम झाले.

दोन वर्षांपासून चाललेल्या या प्रेमाची बातमी अचानक दोघांच्याही लग्नानंतर समोर आली. या दोघांनी शुक्रवारी अयोध्या कोतवाली शहरातील पोलिसांना सांगितले की ते दोघेही प्रौढ आहेत, त्यांचे कानपूरमधील तपस्वी मंदिरात 26 ऑगस्ट रोजी लग्न झाले आणि आता ते पती-पत्नी आहेत.

दोघी अयोध्या कोतवाली शहरात पोचल्या तेव्हा एकीने नवरदेवा सारखे कपडे घालून व दुसरीने वधूसारखे कपडे घालून सजवलेले पायाच्या बोटात लग्नाचे जोडवे होते, त्यानंतर कपाळावर सिंदूर आणि हातात मेंदी.

पोलिसांनी सांगितले की या दोन महिलांची कुटुंबेही या लग्नाविरोधात नाहीत, म्हणून बालिक असल्यामुळे दोघेही एकत्र राहण्यास मोकळे आहेत आणि कुटुंबातील सदस्यांनी हे मान्य केले आहे.

अयोध्याचे जिल्हाधिकारी अमरसिंह सांगतात की कानपूरची एक मुलगी आपल्या मावशी समवेत साहबगंज येथे यायची, यामुळे दोघी प्रेमात पडल्या. दोघेही प्रौढ आहेत आणि कुटुंबाच्या संमतीच्या आधारे त्यांचे लग्न झाले.