पुण्यामध्ये घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनेत २७ लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये २६ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. चोरट्यांनी बुधवार पेठेत असलेल्या गोडाऊनमधून २४ लाख ६० हजार रुपये किंमतीचे सामान चोरून नेले तर दुसऱ्या घटनेत धनकवडी येथील एका सदनिकेतून चोरट्यांनी २ लाख ८ हजार रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली.

बुधवार पेठेतील गोडावूनचे कुलूप तोडून चोरट्यांनी २४ लाख ६० हजार रुपये किंमतीचे लिग्रँड कंपनीचे एमसीबी बॉक्स चोरून नेले. हा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिपक वाधवानी (वय-५६ रा. साधुवासवानी चौक) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक बी.डी. मगर करत आहेत.

दुसऱ्या घटनेत धनकवडी येथील हेरंब हौसिंग सोसायटीमधील बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेली रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ८ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार बुधवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी गौतम कदम (वय-३२ रा. धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक एन.एच. खामगळ करत आहेत.

गायीचा चिक देण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेची सव्वा लाखांची फसवणूक
गाईचा चिक देण्याच्या बहाण्याने आलेल्या एकाने दोन साथिदारांच्या मदतीने वृद्ध महिलेचे सव्वा लाखाचे दागिने चोरून नेले. महिलेच्या गळ्यातील दागिन्यांची डिझाईन पाहण्याचे नाटक करून महिलेचे दागिने चोरून नेले. हा प्रकार बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास कात्रज परिसरात घडला. याप्रकरणी ३३ वर्षीय व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपीने चिक विकण्याच्या बहाण्याने फिर्य़ादी यांच्या घरी आला. त्याने फिर्य़ादी यांच्या आईला तुमच्या गळ्यातील सोन्याचे डिझाईन चांगले असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन केला. गळ्यातील दागिना पाहण्यास मागून माझी आई बाहेर उभी असून तिला डिझाईन दाखून येतो असे सांगत चोरट्यांनी दागिने लंपास केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने घडलेला प्रकार फिर्य़ादीस सांगितला. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक एस.एस. लाड करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या