आता मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस-वे’वर 250 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा ‘वॉच’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस-वेवर वाढलेल्या अपघातांच्या प्रमाणामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक्स्प्रेस वे’च्या दोन्ही लेनवर लवकरच ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसिवण्यात येणार असून, मार्गाच्या दोन्ही बाजूला वाहतूक नियमांचे फलक लावले जाणार आहेत.

ITMS सिस्टम –

एक्स्प्रेस वे’वर इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टम (ITMS) बसविण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठिविण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाली असून, त्याची निविदा प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. यानुसार स्पॉट स्पीड डिटेक्शन सिस्टीम, अ‍ॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टम, जनरल सर्व्हिलन्स, डोम कॅमेरे, स्थिर कॅमेरे, 360 डिग्रीमध्ये फिरणारे कॅमेरे असे अडीचशेहून अधिक कॅमेरे बसविले जाणार आहेत.

वाहनाचा वेग तपासणे, लेन कटिंगवर नजर ठेवणे, नंबर प्लेटचा ऑटोमॅटिक फोटो काढणे अशी वैशिष्ट्ये असलेले सुमारे अडीचशे कॅमेरे, ओव्हरलोड वाहनांचे वजन मोजण्याची यंत्रणा आणि हवामानाची माहिती देणारे सेन्सर पो’ या गोष्टींचा पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर उभारण्यात येणाऱ्या आयटीएमएसमध्ये समावेश असणार आहे.

वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे ‘एक्स्प्रेस वे’वर अपघात मोठ्या संख्येने अपघात होतात. दोन दिवसांपूर्वीच बसचालकाच्या चुकीमुळे पुण्यातील एका प्रख्यात डॉक्टरचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे एक्स्प्रेस वे वरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आहे. आतापर्यंत एक्स्प्रेस वे वर दीड हजारांपेक्षा अधिक व्यक्तींचा अपघाती मृत्यू झाला आहे.

visit : policenama.com

You might also like