सांगली : IPL वर सट्टा घेणाऱ्या दोघांना LCB कडून अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –  सांगलीमध्ये आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (LCB) पथकाने एसटीस्टॅन्ड परिसरातील लॉजवर छापा टाकून आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलीय. चेतन माणिकराव गुजर (वय ३०, केदार अपार्टमेंट शाहू उद्यानजवळ, सांगली) आणि इम्रान अस्लम दानवडे (२६, नुराणी मशिदीजवळ, कत्तलखाना, सांगली) अशी त्या दोघा अटक केलेल्याची नावे आहे.

अधिक माहिती अशी, सोमवारी LCB पथक सांगली शहरात पेट्रोलिंग करीत असताना, एसटीस्टॅन्ड ठिकाणी सुखरूप लॉजवर एक जण राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली. यावरून या पथकाने लॉजवर छापा मारला. यावेळी रूम नंबर २०१ मध्ये चेतन गुजर आणि इम्रान दानवडे क्रिकेटचा सामना बघत बसले होते, तर ते मोबाईलवर बोलत वहीत लिहून घेत असल्याचे आढळून आल्याने त्यावेळी त्यांच्याकडून तब्बल ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, त्या दोंघाकडून ४ मोबाईल, बॉलपेन, हिशेबाच्या वहीसह ५८ हजार ८५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांनी पंचनामा करून, या दोघांना सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या दोघांवर मुंबई जुगार अधिनियम १८८७ चे कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल केला गेला आहार. एसपी दीक्षित गेडाम यांनी IPL सामन्यावर सट्टा घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश LCB चे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना दिले होते. त्यानुसार, सट्टेबाजांवरील कारवाईसाठी खास पथक तयार करण्यात आले.