J & K : सोपोरमध्ये दहशतवाद्यांचा CRPF आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या संयुक्त टीम वर हल्ला , २ जवानांचा मृत्यू ,१ जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या संयुक्त टीमवर हल्ला केला आहे. याबाबत मिळलेल्या अधिक माहितीनुसार या दहशतवादी हल्ल्यात 2 जवानांचा मृत्यू आणि 1 जखमी झाला आहे. भारताचे जवान दहशतवाद्यांचा मुकाबला करीत आहेत.

अलिकडे नियंत्रण रेषेत पाकिस्तानकडून युद्धबंदीचे अनेकदा उल्लंघन झाले आहे. अलीकडेच, पाकव्याप्त काश्मीरमधील दुधनियाल भागात दहशतवादी लॉन्चपॅडच्या विरोधात भारतीय सैन्याने अचूक स्ट्राईक केले. केरन सेक्टरमध्ये पाकिस्तान सैन्याने केलेल्या शस्त्र संधीच्या उल्लंघनंतर आणि घुसखोरीच्या मालिकेनंतर भारतीय सैन्याने हे ऑपरेशन केले.

केरन सेक्टरमधून घुसखोरी करणार्‍या पाच दहशतवाद्यांनाही 1 एप्रिल रोजी भारतीय सैन्याने ठार केले. दुधनियाल येथे सैन्याने लक्ष्य केलेले आणि नष्ट केलेलया समान, लाँच पॅडचा वापर दहशतवाद्यांनी केला होता. त्यामुळे एकूणच भारताला एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे पाकिस्तानी दहशतवाद्यांना तोंड द्यावे लागत आहे.