बुधवार पेठेतील कुंटनखान्यावर छापा टाकून दोन अल्पवयीन मुलींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यामधील बुधवार पेठेतील एका कुंटणखान्यावर छापा टाकून गुन्हे शाखेकडील सामाजिक सुरक्षा विभागाने दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.२६) बुधवार पेठेतील डायमंड बिल्डींगमधील फ्लॅटमध्ये करण्यात आली. या कारवाईत बांगलादेशीय व कर्नाटक राज्यातील या दोन मुलींची सुटका करुन त्यांना महंमदवाडी येथील रेस्क्यु होममध्ये ठेवण्यात आले आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सात जणांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तीघांना ताब्यात घेण्यात आले आहे. चंदा मुईमांग तमांग, संजिदा रुहूल अमीन मुल्ला, कुमार शेलवन तमांग अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
[amazon_link asins=’B0728GFX26′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e5eab3de-7a01-11e8-8890-31aa98d78cd0′]

बुधवार पेठेतील डायमंड बिल्डींगमधील एका फ्लॅटमध्ये अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती पोलीस हवालदार नितीन तरटे यांना समजली. तसेच या मुलींना वेश्या व्यवसायासाठी डांबून ठेवण्यात आले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. सामाजिक सुरक्षा विभागाचे कर्मचारी आणि फरासखाना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तीक कारवाई करुन अल्पवयीन मुलींची सुटका केली.

या कारवाईत वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणारे रुपा तमांग, चंदा मुईमांग तमांग, संजिदा रुहूल अमीन मुल्ला (सर्व रा. कालीकुपुर थाना हावडा, जि. हावडा कोलकत्ता, पश्चिम बंगाल), कुमार शेलवन तमांग (वय-२७ रा. सिंधु पाचो, काठमांडु, नेपाळ), आलम हक (रा. बांगलादेश), शांती (रा. पश्चिम बंगाल) आणि दोन ग्राहक यांच्यावर गुन्हा दाखल करुन दीड हजार रुपये रोख, मोबाईल आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
[amazon_link asins=’B00BZH2RIU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eca56c2c-7a01-11e8-ba91-0538c599f932′]

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, कर्मचारी नामदेव शेलार, प्रमोद म्हेत्रे, राजाराम घोगरे, नितीन तरटे, नितीन लोंढे, रमेश लोहकरे, राजेश उंबरे, नितीन तेलंगे, तुषार आल्हाट, सचिन कदम, प्रदिप शेलार, सचिन शिंदे, सतिश ढोले, रेवणसिद्ध नरोटे, सुनिल नाईक, ननिता येळे, गितांजली जाधव, कविता नलावडे, अनुराधा ठोंबरे, रुपाली चांदगुडे तसेच  फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण अंबुरे व त्यांच्या स्टाफने ही कारवाई केली.