मौजमजेसाठी सायकल चोरून विक्रीसाठी द्यायचे दुकानदाराकडे, दोन अल्पवयीन जाळ्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – मौजमजेसाठी सायकलींची चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुले आणि त्यांच्या सायकली विकून देण्यासाठी ठेवून घेणारा कुदळवाडी येथील सायकल दुकानदार यांच्याकडून १४ चोरीच्या सायकली पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनीट १ च्या पथकाने जप्त केल्या आहे. दोन मुलांसह दुकानदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महंमद फिरोज शहादत शाह (१९, कुदळवाडी, चिखली) असे ताब्यात घेतलेल्या सायकल दुकान चालकाचे नाव आहे.

पिपंरी चिंचवड गुन्हे शाखेचे युनीट एकचे पथक चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत होते. त्यावेळी कुदळवाडी येथील सायकल सेंटरमध्ये चोरीच्या सायकली असून दुकानदाराने काही सायकली विकल्या असल्याची माहिती पोलीस नाईक सचिन उगले यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कुदळवाडी वजन काटा येथील चौधरी सायकल सेन्टरमधून महंमद शाह याला ताब्यात घेतले.

त्यावेली त्याच्याकडे चोरीच्या १० सायकली असल्याचे निष्पन्न झाले. त्या पोलिसांनी जप्त केल्या. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याच्या ओळखीच्या दोन अल्पवयीन मुलांनी सायकली चोरून त्या त्याच्याकडे विक्रीसाठी दिल्या आहेत. असे सांगितले. त्यानंतर दोघांना ताब्यात घेतले. तेव्हा त्यांनी चिखली, भोसरी, निगडी परिसरातून सायकली चोरून त्या विक्री करून त्याचे पैसे मौजमजेसाठी वापरले असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांच्याकडून विक्री केलेल्या व दुकानात असलेल्या अशा एकूण १४ सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद राऩडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनीट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सहायक पोलीस फौजदार रविंद्र राठोड, कर्मचारी सचिन उगले, गणेश सावंत, प्रविण पाटील, गणेश मालुसरे यांच्या पथकाने कली.

Loading...
You might also like