इस्लामपूर : कंटेनर-टेम्पोच्या धडकेत दोन ठार, एक गंभीर

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाईन

रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरला एका भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोची धडक बसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जखमी झाला. हा अपघात शनिवारी (दि.१८) पहाटेच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाघवाडी फाट्याजवळ झाला. घटनेनंतर कंटेनर चालक पसार झाला असून टेम्पो चालक गंभीर जखमी झाला आहे. मृत व्यक्ती हे बेळगाव जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.
शहाहुसेन शब्बीर शेख (वय 26, रा. अंकलीखूर, ता. चिकोडी) आणि त्याचा मावसभाऊ सोहेल दस्तगीर मुरगुडे (वय 24, रा. खानापूर, जि. बेळगाव) अशी  मृतांची नावे आहेत. चालक मोहम्मद सलाउद्दीन सरदार देसाई (वय 39, रा. मेहबूबनगर, ता. चिकोडी) हे या  जखमी झाले. अपघाताची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देसाई  हे टेम्पो (एम.एच.48/टी-5342) घेऊन  बेळगावकडे चालले होते. टेम्पोमध्ये टेम्पो मालकाचा मुलगा शहाहुसेन शेख व त्याचा मावसभाऊ सोहेल मुरगुडे हे  होते. वाघवाडी फाट्याजवळ वारणा कालवे कार्यालयासमोर रस्त्याकडेला एक कंटेनर उभा होता.  टेम्पोची पाठीमागून कंटेनरला जोराची धडक बसली. या धडकेत बाजूला  बसलेले शहाहुसेन व सोहेल  जागीच ठार झाले.

[amazon_link asins=’B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f1f658f8-a2f9-11e8-a2c7-0ff00c8b4649′]
अपघातात टेम्पोच्या केबीनचा पूर्णपणे चक्काचूर झाला. चालक देसाई  केबीनमध्येच जखमी अवस्थेत अडकून पडले होते. काही वेळाने हाय-वे पेट्रोलिंगचे पोलिस निरीक्षक विकास माने, मधुकर साळुंखे, हर्षद माळी यांनी जखमी व मृतांना बाहेर काढले.
[amazon_link asins=’B07B7PTPB2,B00IZ95T7C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d76e0cbf-a2f9-11e8-8cbb-3fa6a87ad041′]