पुणे – सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी येथील अपघातात दोघे ठार

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी गावच्या हद्दीत धनश्री मंगल कार्यालयासमोर चालकाचा ताबा सुटलेल्या एस्टार कारने दोघांना ठोसरले यात एक जण जागीच ठार झाला तर दुसरा उपचारादरम्यान दवाखान्यात दगावला यावर लोणी काळभोर पोलिसात चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विषयी लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात दिनकर वाल्हेकर (वय 69) रा. कुंजीरवाडी ता. हवेली व सुबोध बिरसा डॅग नर्सरी कामगार रा. कुंजीरवाडी हे दोघे ठार झाले आहेत. याविषयी प्रदीप वाल्हेकर यांनी दिलेल्या तक्रारी नुसार त्याचे चुलते दिनकर वाल्हेकर व नर्सरी कामगार सुबोध बिरसा डॅग हे दोघे पुणे सोलापूर महामार्गावरुन सर्वीस रस्त्याने चालत होते त्यावेळी गाडीवर ताबा सुटलेल्या एस्टार गाडीने दोघांना मागून ठोसरले यात दोघे जण गंभीर जखमी झाले.

त्यावर जमलेल्या नागरिकांनी अपघातग्रस्तांना लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु यातील सुबोध हाॅस्पिटलमध्ये दाखल होण्या अगोदर मृत झालेले होते. तर दिनकर वाल्हेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावर एस्टार कार चालक आदीत्यकुमार सिंग रा. वडगाव शेरी पुणे याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.