नव वर्षाचे स्वागत ठरले ‘काळ’ कार विहिरीत पडून दोघांचा मृत्यु

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – नव वर्षाचे जल्लोषात स्वागत करुन पहाटे घरी परतत असताना हा जल्लोषच दोघांच्या मृत्युला कारण ठरला आहे. दारुच्या नशेत भरधाव कार चालविताना ती रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडून त्यात दोघांचा मृत्यु झाला तर, ४ जण जखमी झाले आहेत.दौलताबाद किल्ल्यासमोरील घाटात पहाटे २ वाजता ही घटना घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, औरंगाबाद शहरातील रोकडा हनुमान कॉलनी परिसरात राहणारे तरुण तरुणी नव वर्ष साजरा करण्यासाठी चार गाड्यांनी औरंगाबाद शहराबाहेरील धाब्यावर गेले होते. तेथे त्यांनी जल्लोषात नववर्षाचे स्वागत करताना मद्यपानही केले. त्यानंतर ते सर्व जण औरंगाबाद शहराकडे परत येत होते. चारही गाड्या एकामागोमाग येत असताना दौलताबाद किल्ल्याजवळील घाटातील वळणावर एका गाडीतील चालकाचे नियंत्रण सुटले व त्याची गाडी रस्ता सोडून सरळ खालच्या बाजूला असलेल्या एका विहिरीत जाऊन पडली.

ही बाब समजताच इतरांना तिकडे धाव घेऊन गाडीतील लोकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नाकातोंडात पाणी गेल्याने त्यातील दोघांचा मृत्यु झाला. गाडीतील इतर ४ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ही कार बाहेर काढण्यात आली आहे़.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?