प्रसिध्द कंपनीच्या डायरेक्टरनं इतर 2 साथीदार संचालकांना घातल्या भर मिटींगमध्ये गोळ्या, दोघांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्रेटर नोयडाच्या बादलपूर कोतवाली क्षेत्राच्या छपरोला मध्ये दोन लोकांची गोळी घालून हत्या करण्यात आली. तर एकाची प्रकृती नाजूक आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सांगितले जात आहे की, युपी टेलिलींक लिमिटेडच्या डायरेक्टरने मिटींगच्या दरम्यान आपल्या सहकारी डायरेक्टरवर आपल्या रिव्हॉल्व्हरनं गोळी झाडली आणि त्यानंतर स्वतःवर देखील गोळी झाडली. गोळी लागल्याने जखमी झालेला एक अन्य डायरेक्टर राकेश जैन यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युपी टेलिलींक लिमिटेडचे तीन पार्टनर होते. प्रदीप, नरेश आणि राकेश नावाचे हे तिन्ही लोक संयुक्तपणे कंपनी चालवत होते. गुरुवारी झालेल्या मीटिंगमध्ये या तिघांमध्ये कशावरून तरी वाद झाला. दरम्यान प्रदीप यांनी आपल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरवरून गोळीबार केला.

केबल बनविणार्‍या या कंपनीच्या तीन भागीदारांमध्ये झालेल्या चकमकीत प्रदीपने परवाना रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. या गोळीबारात नरेश आणि प्रदीपचा जागीच मृत्यू झाला तर राकेश जखमी झाला आहे. सांगितले जात आहे की, नरेश आणि राकेशला गोळी मारल्यानंतर प्रदीपने स्वत:ला गोळी मारून घेतली.