CAA : कर्नाटकातील मंगळुरुमध्ये हिंसक वळण, पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू

मंगळुरू : वृत्तसंस्था – सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. कर्नाटकात मंगळुरुमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाल्याचे पीटीआयने वृत्त दिले आहे. कर्नाटकात आज झालेल्या आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. तसेच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. मंगळुरु पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराचा वापर करत गोळीबार केला. पोलीस कारवाईत दोन आंदोलक जखमी झाले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना मृत्यू झाला, तर 20 आंदोलक जखमी झाले आहेत.

दरम्यान, लखनौमध्ये देखील एकाचा मृत्यू झाला आहे. मात्र, पोलिसांच्या गोळीबारात हा मृत्यू झाला की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. लखनौच्या परिवर्तन चौकात आंदोलनासाठी जमलेल्या जमावाने पोलीस ठाण्याला आग लावली. रस्त्यावर उभी असलेली वाहने जाळली. यामध्ये माध्यमांच्या ओबी व्हॅनचा समावेश होता. आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. तसेच अश्रुधुराची नळकांडी फोडली.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/