चार तासांमध्ये 2 किलो वजन कमी; जाणून घ्या मेरी कोमचं स्पेशल वर्कआउट ! 

वृत्तसंस्था-ऑलिम्पिक्स, कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतासाठी पदकांची कमाई करणारी सुपर मॉम मेरी कोमने बॉक्सिंगच्या वेगवेगळ्या आव्हानांसोबतच वजन कमी करण्यासाठीचे आव्हानही तितक्याच ताकदीने पेलवलं आहे. मेरीने अवघ्या चार तासांमध्ये वजन कमी करण्याची किमया केली आहे. तिने फक्त चार तासांमध्ये दोन किलोपर्यंत वजन कमी केलं होतं. आता तुमच्या मनात अनेक प्रश्नांनी गोंधळ घातला असेल, मेरीने असं का केलं? आणि खरचं चार तासांमध्ये दोन किलो वजन कमी करणं कसं शक्य आहे? यांसारख्या अनेक प्रश्नांनी डोकं भंडावून सोडलं असेल ना? थांबा शांत व्हा. आम्ही तुम्हाला सांगतो मेरीने नक्की काय केलं आणि कशासाठी केलं…
पोलंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 13व्या सिलेसियन बॉक्सिंग टूर्नामेंटमध्ये मेरी कॉमला 48 किलो कॅटेगरीमध्ये भाग घ्यायचा होता. परंतु तिचं वजन त्या कॅटेगरीमध्ये भाग घेण्यासाठी दोन किलोपेक्षा जास्त होतं. टूर्नामेंट सुरू होण्यासाठी अवघे चार तास शिल्लक होते. अशातच मेरीपुढे मोठं प्रश्नचिन्ह होतं. तिने मनाशी निश्चय पक्का केला आणि अवघ्या चार तासांमध्ये फक्त वजनच कमी केलं नाही तर त्या टूर्नामेंटमध्ये सहभागी होऊन त्यामध्ये गोल्ड मेडलही आपल्या नावे केलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेरीने फक्त स्किपिंग करून हे वजन कमी केलं आहे. ती जवळपास एक तासापर्यंत स्किपिंग करत होती.
स्किपिंग करताना पायांपासून डोक्यापर्यंत शरीराच्या सर्व अवयवांची मूव्हमेंट होते. रश्शी उड्या म्हणजेच स्किपिंग करणं ही एक रोप कार्डियो एक्सरसाइज आहे आणि जर तुम्हीही दररोज 15 मिनिटांसाठी स्किपिंग केलं तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं.
15 मिनिटांमध्ये 200 कॅलरी करा बर्न 
15 मिनिटांसाठी स्किपिंग केल्यामुळे 200 कॅलरी खर्च केल्या जाऊ शकतात. यामुळेच स्किपिंग करून लगेच वजन कमी करण्यात येतं. खास गोष्ट म्हणजे दररोज अर्धा तासामध्ये स्किपिंग केल्यामुळे महिन्याभरात पाच किलो वजन कमी करणं शक्य होतं.
स्किपिंग केल्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. कारण जेव्हा आपण स्किपिंग करतो त्यावेळी धाप लागते आणि श्वास जोरात घेण्यात येतो. यामुळे लांब श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा क्रम वाढतो. त्यामुळे फुफ्फुसांचा व्यायाम होतो. स्किपिंग केल्यामुळे खूप घाम येतो त्यामुळे त्वचेची रोमछिद्र मोकळी होतात आणि त्वचेला श्वास घेणं शक्य होतं. त्याचबरोबर त्वचेवरील अॅक्ने आणि डाग दूर होतात. स्किपिंग करताना उड्या कमी उंचीवर मारा. ज्यास्त मोठ्या उंचीवर उड्या मारल्याने त्याचा गुडघ्यांवर परिणाम होऊ शकतो. जर तुमचं वजन कमी असेल तर आधी दुसऱ्या एक्सरसाइज करून वजन कमी करून घ्या. जेव्हा शरीर फ्लेक्सिबल होईल त्यानंतरच स्किपिंग करा.

आयफोनसाठी त्याने बाथटबभरून चिल्लर नेली आणि…..

वृत्तसंस्था-आपली आवडती वस्तू विकत घेण्यासाठी कोण काय करेल हे काही सांगता येत नाही. अनेकदा लोक विचित्र मार्ग अवलंबताना दिसतात. अॅपलचा आयफोन घेण्यासाठी बऱ्याचदा किडनी विकल्याची बातमी आपण ऐकली असेल. असाच काहीसा विचित्र प्रकार समोर आला आहे. पण एका रशियाच्या व्यक्तीने कहरच केला. iPhone XS खरेदी करण्यासाठी त्याने बाथ टबमध्ये भरून तब्बल 1 लाख रुसी रुबलची चिल्लर आयफेनच्या स्टोअरमध्ये नेत फोन घेतला. ही चिल्लर मोजायला दुकानदाराने क्लार्कलाच बसविले आणि हा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली.

रशियाच्या या युवकाने बाथ टबमध्ये 1 लाख रुबल म्हणजेच 1.07 लाख रुपयांची चिल्लर भरली. एवढे मोठे वजन उचलण्यासाठी त्याला त्याच्या मित्रांचीही मदत घ्यावी लागली. त्याला या लवाजम्यासह पाहून स्टोअर मालकही थक्क झाला. त्याने या युवकाला माघारी न पाठविता ती चिल्लर मोजण्यासाठी क्लार्कला बसविले. सर्व चिल्लर मोजून झाल्यानंतरच त्या युवकाला  iPhone XS चे 256 जीबीचे व्हेरिअंट देण्यात आले.