2 अल्पवयीन मुलींना नको ‘त्या’ धंद्याला लवणार्‍या माय-लेकींना अटक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – दोन अल्पवयीन मुलीकडून वेशाव्यवसाय करून घेणा-या एका 41 वर्षीय दलाल महिलेसह तिच्या 17 वर्षीय मुलीला ठाणे पोलिसांनी सोमवारी (दि. 5) अटक केली आहे. त्यांच्या तावडीतून दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. 1 लाख रुपयांच्या बदल्यात त्यांना या अनैतिक व्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात आले होते.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात दोन अल्पवयीन मुलींना शरीरविक्रीचा व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती एका सामाजिक कार्यकर्त्याने ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला दिली होती. त्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या पथकाने सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास वागळे इस्टेट रोड क्रमांक 15 येथे हॉटेल साऊथ कोस्ट येथे सापळा लावला.

या ठिकाणी एक लाखांमध्ये दोन कुमारी मुलींचा एका दलाल महिलेने तक्रारकर्त्या सामाजिक कार्यकर्त्याशी सौदा केला. हा सौदा पक्का झाल्यानंतर पोलिसांनी दलाल महिलेसह तिच्या मुलीलाही ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या तावडीतून दोन अल्पवयीन मुलींचीही सुटका केली आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.