दिघीत घर फोडून दोन लाखाचा ऐवज लंपास

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – बंद घराचे कुलूप तोडून एक लाख ८८ हजार ८०० रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, टीव्ही असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना साई पार्क, दिघी येथे उघडकीस आली.

या प्रकरणी मधुकर मारुती शिंदे (५८, रा. गुरुदत्त कॉलनी, साई पार्क, दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. तर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सात ते मंगळवारी सकाळी सहाच्या दरम्यान शिंदे यांचे घर कुलूप लावून बंद होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कडी-कोयंडा, कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि टीव्ही असा एकूण एक लाख ८८ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.