राष्ट्रवादीचे ‘हे’ 2 दिग्गज आजच मंत्रीपदाची शपथ घेणार, छगन भुजबळांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे हे आज (गुरूवार) शिवतीर्थावर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे दोन बडे नेते मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामध्ये छगन भुजबळ यांचा समावेश असणार आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची महिती यापुर्वीच समोर आली होती. आता मात्र दस्तुरखुद्द छगन भुजबळ यांनीच प्रसारमाध्यमांशी बोलताना ते स्वतः आजच मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती दिली आहे.

राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि छगन भुजबळ हे आज शिवतीर्थावर मंत्रीपदाची शपथ घेतील हे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान, उध्दव ठाकरे यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना शपथविधी सोहळयासाठी निमंत्रीत केल्याची बातमी समोर आली आहे. काँग्रेसकडून कोण मंत्री पदाची शपथ घेईल हे अद्यापही समोर आले नसले तरी काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात हे मंत्रीपदाची शपथ घेतली अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

Visit : Policenama.com