मतदारसंघात दररोज दोन वेळेचे जेवण पुरविणारा ‘देव’ माणूस

अक्कलकोट : पोलीसनामा ऑनलाइन – आमदार सचिन कल्याणशेट्टी हे कोणताही गाजावाजा न करता गरीब कुटुंबाना दररोजच दर्जेदार दोन वेळेचे जेवण पुरवित आहेत.गेल्या दहा दिवसांपासून दोन वेळेचे दर्जेदार जेवण पुरविण्याचा उपक्रम सतत कोणताही आणि कसलाच खंड न पडू देता सतत सुरू आहे.

अक्कलकोट चे लोकप्रिय आमदार सचिन कल्याणशेट्टी हे अक्कलकोट मध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी असे मिळून दोन वेळेचे अतिशय चांगल्या दर्जाचे जेवण जवळ जवळ दीड ते दोन हजार गरजु कुटुंबांना रोज आपल्या १५ ते २० कार्यकर्त्यांमार्फत घरपोच पुरवित आहेत.

सध्या देशांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती गंभीर बनली असताना, अनेक जण केवळ प्रसिद्धी साठी किलो अर्धा किलो धान्य वाटप करून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत असताना अक्कलकोट चे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे मात्र कोणत्याही प्रसिध्दी पासून दूर राहत आणि आपल्या मतदारसंघातील नागरिक हा आपलाच आहे असे मानून गेल्या दहा दिवसांपासून सतत या कामात कोणतीही खंड न पडू देता अतिशय चांगल्या दर्जाचे जेवण तयार करून ते गरजु कुटुंबापर्यंत पोचवीत आहेत.

यासाठी त्यांनी स्वतंत्र यंत्रणाच तयार केली असून त्यांच्या कडे असलेल्या कार्यकर्त्यामधील मोजक्याच
२० कार्यकर्त्यांवर व लोकप्रिय नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.
नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या उत्कृष्ट नियोजन व निगरानिखाली हे जेवणाचे दोन वेळेचे डबे गरजु व गरीब कुटुंबाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरोघर पोचविण्याचे अतिशय नियोजन बद्ध काम केले जात आहे.

गेल्या १० दिवसापासून कोणत्याही प्रसिद्धी पासून अलिप्त राहून आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांचे गोरगरिबांना दोन वेळेचे जेवण पुरविण्याचे हे काम अतिशय पुण्याचे आणि संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी उभे राहण्याचे आहे असे मत अनेक गरीब कुटुंबातील व्यक्तींनी प्रस्तुत प्रतिनिधी शी बोलून दाखविले.

सचिन जनतेचा आशीर्वाद आहे
आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी हे अक्कलकोट मधील व तालुक्यातील नागरिकांच्या कुटुंबाची अडचण ओळखुन त्यांना रोज दोन वेळेचे जेवण पुरविण्याचे काम कोणतीही प्रसिद्धी न करता करत आहेत हा त्यांच्या मनाचा फार मोठा मोठेपणा असून जनतेचा त्यांना आशीर्वाद आहे. -भौरम्मा कोळी महिला नागरिक अक्कलकोट

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like