पुण्यातील हडपसरमध्ये गांजा बाळगणारे दोघे पोलिसांच्या ‘जाळ्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर येथे मोटारसायकलवर संशयास्पदरित्या थांबलेल्या दोघांची पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे २ लाख रुपयांचा ७ किलो ९३५ ग्रॅम गांजा आढळून आला. गांजा बाळगणाऱ्या या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

संदिप भागवत वाघ (रा. उपळाई ठोगे, ता. बार्शी, जि. सोलापूर) आणि अभिजित भगवान थिटे (रा. वैभव टॉकीजसमोर गरड बिल्डिंग, हडपसर, मुळे बार्शी) अशी त्यांची नावे आहेत.

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय टिकोळे हे सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना हडपसर येथील ट्रँगल ब्रीजजवळ एका मोटारसायकलवर दोघे जण संशयास्पदरित्या थांबलेले आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. तेव्हा त्यांच्याकडील सॅकची तपासणी केल्यावर त्यात ७ किलो ९३५ ग्रॅम गांजा आढळून आला. पुढील कारवाईसाठी त्यांना हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –