‘तात्या – मामा’ टोपण नाव असलेली दोघे पुराच्या पाण्यात ‘बेपत्ता’

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – पांझरा नदी पात्रात सोमवारी शहरातील अक्षय गौतम सोनवणे टोपण नाव तात्या, वरखेडी गावातील विलास दादा मराठे टोपण नाव मामा अशी टोपण नावे असलेली दोन व्यक्ती पांझरा नदी पात्रातील पाण्यात वाहुन गेली.

सविस्तर माहिती की पांझरा नदीला आलेला महापुर ओसरल्या नंतर अक्कलपाडा धरणातून अजून ही काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पांझरा नदी पात्र दुथडी भरुन वाहत आहे. यात आज सोमवारी मोगलाई जवळील धोबी घाटाजवळून पाण्याच्या प्रवाहात उड्या मारल्या. यात मोगलाईतील फुले नगर येथील राहणारा तरुण अक्षय गौतम सोनवणे वय २५, टोपण नाव तात्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. सोबत पोहत असणाऱ्या व नदी किनारी उभे असलेल्या तरुणांनी हे पाहताच चटकन पात्रात उडी मारत तरुणाला वाचविण्याचा प्रयत्न केला.

यावेळी काही अन्य तरुणांनी आरडाओरड केली. जवळील घरातील काही तरुण दोर घेऊन पाण्यातील तरुणाला वाचविण्यासाठी शोध सुरू केला. तरुण पाण्यात बुडला हि वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. नदी पात्राजवळ दुतर्फा हजारो नागरीकांनी गर्दी केली. पुराच्या पाण्यात तरुण बुडाला हि माहिती आपत्ती व्यवस्थापनाला नागरीकांनी भ्रमण ध्वनीने दिली. माहिती मिळताच बचाव दल मदतीसाठी पांझरा नदी किनारी पोहचले. पुराच्या पाण्यात गाळ, घाण, झाडाच्या फांद्या अडकुन राहिल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला.

काही तासांतच शहराजवळील अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वरखेडी गावातही पांझरा नदी पात्रात एक व्यक्ती वाहुन गेला. हि वार्ता गावात पसरली. नदी पात्रात ग्रामस्थांच्या मदतीने शोध कार्य सुरु आहे. पुरात वाहुन गेलेल्या व्यक्तीचे नाव विलास दादा मराठे (टोपण नाव मामा) आहे. दोन्ही व्यक्ती पांझरा नदी पुराच्या पाण्यात वाहुन गेल्या आहे. बचाव दलाच्या वतीने शोध कार्य सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त