धक्‍कादायक ! उघडयावर शौच करणार्‍या मुलांची बेदम मारहाण करून हत्या, ‘या’ कारणामुळं केलं कृत्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशातील सिरसौद परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्याच्या बाजूला शौचाला बसलेले असताना दोन मुलांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काठीने मारहाण करून या दोन मुलांची हत्या करण्यात आली. 12 वर्षीय रोशनी आणि 10 वर्षीय अविनाश अशी मृत मुलांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक केली आहे. हाकिम यादव आणि रामेश्वर यादव अशी आरोपींची नावे आहेत. राक्षसाच्या आदेशानुसार, त्यांनी हे कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले.

आरोपींनी मुलांचा व्हिडीओ काढला –

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावखेडी गावातील मनोज वाल्मीकि हे त्यांच्या परिवारासह राहतात. मनोज यांची बारा वर्षीय बहीण रोशनी आणि 10 वर्षीय मुलगा अविनाश शौचासाठी गेले होते, त्यावेळी त्यांची मारहाण करून हत्या करण्यात आली. घटनेनंतर गावात मोठ्या प्रमाणात तणाव असून मोठ्या प्रमाणात पोलीस गावात तैनात करण्यात आले आहेत. या मारहाणीवेळी आरोपींनी या मुलांचा व्हिडीओ देखील बनवला.

पीडित परिवाराने केला जातीयवादाचा आरोप –

मृत रोशनी हिचा भाऊ मनोज याने सांगितले कि, आरोपी हाकीम हा नेहमी त्याच्या परिवारावर वाईट नजर ठेऊन होता. हाकीमच्या घरातील एक सदस्य सरपंच असून त्यांनी मनोजच्या घरात शौचालय देखील बांधू दिले नव्हते. तसेच गावातील नागरिक त्याला जातीवाचक शब्दांवरून देखील बोलत असल्याचे देखील त्याने सांगितले. तसेच त्याच्याबरोबर नेहमी अस्पृश्यासारखा व्यवहार होत असल्याचा देखील आरोप त्याने केला.

दरम्यान, पोलीस अधीक्षक राजेश चंदेल यांनी घटनेविषयी सांगितले कि, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता या दोन्ही बाजुंनी तपास करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Visit : policenama.com