धुळे : 18 मोबाईल चोरणार्‍या दोघांना शिरपूर तालुका पोलिसांकडून अटक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – 18 मोबाईल चोरणार्‍या दोघांना शिरपूर तालुका पोलीसांनी अटक केली आहे. उमेश विश्वनाथ चव्हाण आणि सुनिल भटु सोनार अशी अट केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एकून दिड लाख रुपयांचे 18 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

सविस्तर माहिती अशी की, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना माहिती मिळाली की, दहिवद गावात दोन व्यक्ती महागडे मोबाईल कमी दरात विक्री करत आहे. त्यानुसार बनावट ग्राहक बनुन मोबाईल विक्री करणाऱ्या दोघांना पोलीसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता दहिवद गावातील वेगवेगळ्या ठिकाणांहून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून विविध कंपनीचे एकून दिड लाख रुपये किंमतीचे 18 मोबाईल जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिकारी डाॅ. राजु भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व शिरपूर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like