World News : ‘या’ शहरात आता 2021 मध्ये दिसेल सूर्य, दोन महिन्यांपर्यंत राहील अंधार

वॉशिंग्टन : अमेरिकेत एक शहर असेही आहे जेथे लोकांना दोन महिन्यापर्यंत सूर्य दिसणार नाही. अमेरिकेच्या अलास्कामध्ये लोक पुढील दोन महिने अंधारात राहणार आहेत. आता या शहरात 23 जानेवारीला स्थानीक वेळेनुसार दुपारी एक वाजता सूर्योदय होईल. सरकारने अधिकृतरित्या 65 दिवसांपर्यंत अंधार राहणार असल्याची घोषणा केली आहे.

कारण, अलास्का ध्रुवीय क्षेत्रात येते. याच्या उतकियागविक शहरात आता 23 जोनवारीला सूर्य दिसेल. उत्तर ध्रुवाकडू पुढे सरकत थंडीत काही ठिकाणी दिवस इतके छोटे होतात की, तिथे प्रकाश नसतो. येथे थंडीत दिवसासुद्धा अंधार असतो, कारण आर्कटिक सर्कल उंचावर असल्याने सूर्य येथे क्षितिजापेक्षा वर येऊ शकत नाही. या स्थितीला पोलर नाईट्स म्हटले जाते.

द वेदर नेटवर्कच्या एका रिपोर्टनुसार, 18 नोव्हेंबरला अलास्कामध्ये शेवटचा सूर्यास्त झाला आहे. आता तिथे 23 जानेवारीला सूर्योदय होईल. यावेळी येथील नागरिकांनी नुकतीच शहरावर तयार एक चित्रपट पाहून अंधार होण्याचा जल्लोष साजरा केला आहे.

4 हजारची लोकसंख्या असलेल्या उतकियागविकमध्ये सूर्य आणि प्रकाशाशिवाय हवामान खुप थंड असते. अनेकदा येथे तापमान मायनस 10 ते 20 डिग्रीपर्यंत पोहचते. दोन महिन्याच्या अंधारात शहरात सरासरी तापमानसुद्धा मायनस 5 डिग्रीपेक्षा खाली राहाते.

पोलर नाईट्सची स्थिती अमेरिकेतील अलास्कासह रशिया, स्वीडन, फिनलँड, ग्रीस आणि कॅनडाच्या काही शहरांत सुद्धा निर्माण होते. कॅनडाच्या ग्रीस फिओर्डमध्ये 100 दिवसांपर्यंत अंधाराची स्थिती कायम राहाते.