Coronavirus : नागपूरमध्ये आणखी दोघांना ‘कोरोना’ची लागण, राज्यातील संख्या 15 वर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या आता १५ वर पोहोचली आहे, कारण नागपूरमध्ये आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागपूरमधील रुग्णांची संख्या आता ३ वर पोहोचली असून याबाबतची अधिकृत माहिती सांध्याकाळी देण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान आज ज्या दोघांना लागण झाली ते दोन्ही पती-पत्नी परदेशातून आले आहेत. तसेच अजून सहा कोरोनाच्या संशयितांवर मेयोमध्ये उपचार सुरु आहेत. या व्यक्तींमध्ये ज्या दोघांना लागण झाली आहे त्यांचे आई-वडील, सासू-सासरे, मुलगा, मुलगी, दोन मोलकरणी, दोन मित्र, टॅक्सीचा ड्रॉयव्हर, प्राथमिक उपचार करणारे फॅमिली फिजिशियन आणि गार्डनर यांचा समावश आहे.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले की, नागपूरमधील लागण झालेल्या एका रुग्णाच्या जवळपास १२ नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर अजून दोन लोकांचे रिपोर्ट संध्याकाळी येणार आहेत. या दोघांचे रिपोर्ट मेयोमधून येत असून अधिकृत माहिती संध्याकाळी येईल असे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी सांगितले की आतापर्यंत ७७१ लोकांची स्क्रीनिंग करण्यात आली आहे.