ब्रेकिंग : पुण्यात आणखी दोन जणांचा बळी, आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं पुणे शहारत अक्षरश: धुमाकूळ घातला असून गेल्या 24 तासात कोरोनामुळं शहरात एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शहरात नव्याने तब्बल 25 कोरोनाबाधित आढळले असून शहरातील एकुण रुग्णांची संख्या 154 वर जाऊन पोहचली आहे.


आज (बुधवार) ससून रुग्णालयात 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर नायडू हॉस्पीटलमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. इतरांचा वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाले आहेत. पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की पुण्यातील मृतांचा आकडा 18 वर पोहचला आहे. त्यापैखी 10 जणांचा मृत्यू आज एकाच दिवशी झाला आहे.

दरम्यान पुण्यात कोरोनामुळं चितेचं वातावरण आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजन करीत आहेत. पोलीसांनी दोनच दिवसांपूर्वी 4 पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही परिसर सील करण्यात आला होता. तसेच सिंहगड रोड परिसरातील देखील काही भाग सील करण्यात आला आहे. पुणे शहरात संचार बंदी लागू आहे.