Coronavirus : पुण्यात आणखी दोघांचा मृत्यू, ‘कोरोना’ संशयित रूग्णांच्या उपचारासाठी शहरात 74 ‘फ्ल्यू क्लिनिक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एव्हढेच नाही तर पुण्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या घटनेतही वाढ होत आहे. दरम्यान आज पुण्यात ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आणखी २ जणांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्यांमध्ये गंजपेठ परिसरातील 54 वर्षीय पुरूष व कोंढवा येथील 47 वर्षीय महिलेचा समावेश आहे. याचबरोबर शहरातील एकूण मृतांचा आकडा 45 वर पोहचला आहे.

पुण्यात कोरोनासंशयितांकरिता ७४ फ्लू क्लीनिक

दरम्यान पुणे शहरातील करोना संशयित रुग्णांच्या उपचाराकरिता पुणे महानगरपालिकेमार्फत ७४ दवाखान्यांमध्ये फल्यू क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात ही रुग्णालये कोणती आणि कोठे आहेत त्याची यादी देखील पुणे महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे की , कोणत्याही व्यक्तीला सर्दी, खोकला, घसा दुखी, ताप, दम लागणे अशी लक्षणे आढळून आल्यास घाबरुन न जाता आपलया नजीकच्या पुणे महानगरपालिकेच्या प्रसिद्ध केलेल्या रुग्णालयांमध्ये जाऊन तपासणी आणि उपचार करून घेण्यात यावेत

राज्यातील आकडा ३०८१ वर

महाराष्ट्रात नव्या १६५ कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. महत्वाची बाब म्हणजे यापैकी १०७ मुंबई येथील आहेत. आज अपडेट झालेल्या आकडेवारीनुसार मुंबई येथे सर्वाधिक नव्या १०७ रुग्णांची नोंद झाली आहे. माहितीनुसार नवी मुंबई -२ ,वसई विरार -२, ठाणे जिल्हा -१,ठाणे -३, पीएमसी -१९, पीसीएमसी -४,पनवेल -१,नागपूर -११,एमसीजीएम-१०७, मालेगाव -४, चंद्रपूर -१, अहमदनगर -१ महाराष्ट्रातील नव्या कोरोनाबाधिताची संख्या अशी आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा ३०८१ वर गेला आहे.