Coronavirus : कोरोनामुळे पुण्यात आणखी दोघांचा बळी, आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विळखा पुण्यात वाढत चालला असून आज (बुधवार) सकाळी कोरोना बाधित असलेल्या आणखी दोघांचा मृत्यु झाला आहे. मंगळवारी पुणे शहरातील तिघांचा एकाच दिवशी मृत्यु झाला होता. आता पुण्यातील मृत्यु झालेल्यांची संख्या 10 झाली आहे.

मृत्यू झालेल्यापैकी एकजण 44 वर्षाचा पुरुष होता. त्यांचा मृत्यू नायडू हॉस्पिटल मध्ये झाला आहे. त्यांना 4 एप्रिलला हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते तर दुसऱ्याचा मृत्यू ससून हॉस्पिटल मध्ये झाला आहे.

दरम्यान, बारामती येथून एक धक्कादायक वृत्त आलं आहे. भाजी विक्रेत्याच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

बारामतीतील कोरोना विषाणूची लागण झालेल्या भाजी विक्रेत्याच्या कुटुंबामध्ये कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या भाजी विक्रेत्याचा मुलगा आणि सुनेला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.


समर्थनगर परिसरातील एका भाजी विक्रेत्यास कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी लक्षात आल्यावर त्याच्या संपर्कातील १२ जणांना तातडीने पुण्याला तपासणीसाठी आणण्यात आले होते. त्यातील ७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर, मुलगा आणि सून यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या भाजी विक्रेत्या कुटुंबाच्या संपर्कात आणखी कोण कोण आले होते, त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हा भाजी विक्रेता पुण्याला जाऊन आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुण्यात आला असताना त्याला ही लागण झाली असल्याची शक्यता आहे. मात्र, पुण्यात कोणामार्फत त्यांना कोरोनाची लागण झाली हे समजणे अवघड झाले आहे. त्यामुळे पुण्यात आणखी गंभीर परिस्थिती होण्याची शक्यता त्यातून व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसात दोन रुग्ण आढळल्याने बारामतीतही कडक उपाय योजना करण्यास सुरुवात झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like