पुणे शहरातील आणखी 2 पोलिस अधिकार्‍यांना ‘कोरोना’ची लागण, सहकार्‍यांना केलं ‘क्वारंटाईन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुणे शहर पोलीस दलातील आणखी दोन पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मध्यवर्ती पोलिस ठाण्यातील हे दोन्ही अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारटाईन करण्यात आले असून त्यांची देखील तपासणी केली जाणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

यामुळे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.

शहर पोलिस दलात एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे नुकतेच समोर आली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली होती. सुदैवाने त्या पोलीस ठाण्यात असलेल्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. या दोन्ही पोलीस अधिकाNयांना थंडी, ताप, खोकला येत असल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये दोघेही पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्या संपर्कात असलेल्या सर्वांची चाचणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत शहर पोलीस दलातील २७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना प्रसार सुरू झाल्यानंतर दीड महिनीपयर्वी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला प्रथम लागण झाली होती. त्यानंतर संबंधित ठाण्यातील ८ कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. त्यामुळे एकाच इमारतीत असलेल्या दोन स्वंतत्र पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांमध्ये भीती होती. आता आणखी याच इमारतीमधील अधिकाऱ्यांना लागण झाल्याने मनात भीती आहे.