वेगाच्या नशेचे आणखी दोन बळी

पिंपरी  : पोलीसनामा ऑनलाईन 

पुणे बंगळुरु महामार्गावर भरधाव कारने ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाला. पुनावळे गावाच्या हद्दीत मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

समीर अश्पाक शेख (वय ३३, रा. रजनीगंधा हौसिंग सोसायटी वाल्हेकरवाडी चिंचवड ),अभिषेक मनोज माने (वय १८, रा. चिंतामणी कॉलनी वाल्हेकरवाडी चिंचवड पुणे ) अशी मृतांची नावे आहेत.

मित्राच्या वाढदिवसासाठी हे दोघे सोमवारी मध्यरात्री  कारने प्रवास करत होते. पुनावळे गावाच्या हद्दीत  त्यावेळी कारने ट्रकला मागून धडक दिल. त्यानंतर नागरिकांनी त्या दोघांना रुग्णालयात दाखल केले.  या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहेत. या दोघांपैकी एक जण वेगाने वाहन चालवत होता तर दुसरा त्याचे चित्रीकरण करत होता. तरुणांनी व्हॉट्सअ‍ॅपवर वेगवान वाहनांचे स्टेटस अपलोड केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.  यातील माने हा तरुण आर्किटेक्ट आहे.

गेल्या महिन्यांमध्ये अशाच प्रकारचा अपघात पुणे मुंबई महामार्गावर पिंपरी येथे झाला होता. इन्स्टाग्रामवर वाहन चालवत लाइव्ह अपडेट करताना दोघांचा मृत्यू झाला होता. ते ताशी १२० ते १४० किमी वेगाने गाडी चालवत होते. त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटून त्यात दोघांचा मृत्यू झाला होता.