महापालिकेत सत्ताधाऱ्यांमध्ये घमासान, गटनेत्यासह सेनेचे दोन नगरसेवक निलंबित

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिका सभागृहामध्ये भ्रष्टाचाराच्यासंदर्भात बोलू देत नाही यावरु माईकसह इतर साहित्याचे नुकसान केल्याने भाजपचे महापौर विजय अग्रवाल यांनी शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा आणि गजानन चव्हाण या दोघांना आज (शुक्रवार) सभेतच निलंबित करण्यात आले.

या कारवाईमुळे शिवसेनेच्या नागरसेवकांनी महापौर यांच्या समोरच्या जागेत ठिय्या आंदोलन केले. महापौरांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी शिवसेनेच्या दोन नगरसेवकांना सभागृहातून बाहेर काढत पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

अकोला शहरात योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे सुरु आहेत. यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. या संदर्भात शिवसेनेकडून चर्चेची मागणी करण्यात आली होती. मात्र, महापौरांनी या संदर्भात लेखी स्वरुपात माहिती देण्यात येईल असे सांगितले. महापौरांचे म्हणणे शिवसेनेच्या नगरसेवकांना मान्य नसल्याने त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान पोलिसांनी दोन नगरसेवकांना ताब्यात घेतल्याची बातमी शहरात पसरली. त्यामुळे शिवसैनिकांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने याठिकाणी तणावाचे वातावरण होते.