काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह ‘हा’ नेता स्पर्धेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात निवडणुकीनंतर काँग्रेसने शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश केला नसल्याने त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरु आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबरच माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे नाव देखील प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर तत्कालिन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. त्यांच्या नेतृत्वात पक्षाने राज्यात चांगली कामगिरी केली. काँग्रेसला राज्यामध्ये 44 जागांवर विजय मिळवता आला.

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये बिनसले. त्यामुळे 30 वर्षाची युती संपुष्टात आली. शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेत महाविकास आघाडी तयार करुन सरकार स्थापन केले. यात बाळासाहेब थोरात यांची महत्त्वाची भूमिका होती. सरकार स्थापन झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने काँग्रसकडून नव्या प्रदेशाध्यक्षाचा शोध सुरु केला.माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाही समावेश मंत्रिमंडळात करण्यात आल्यानं त्यांचं नाव स्पर्धेतून बाहेर पडलं.

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांची वर्णी लागली. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. चव्हाण यांच्या पाठिशी केंद्रातील अनुभव असून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. तर दुसरीकडे विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे नाव हायकमांडकडे पाठवले आहे. राज्यात काँग्रेसची पिछेहाट होत असताना विदर्भाने पक्षाला हात दिला. त्यामुळे विदर्भाला केंद्रित करुन देशभरात पुन्हा काँग्रेसला सक्षम करायचे असल्यास प्रदेशाध्यक्षपद विदर्भात द्यावे अशी मागणी काही नेत्यांनी केली आहे. असे असले तरी प्रदेशाध्यपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असून कोणाच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडते हे पहावे लागेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?