खंडणी आणि तोडफोडप्रकरणी २ सराईत गुंड गजाआड

पुणे : पोलीनसामा ऑनलाईन – शिवजयंतीच्या नावाखाली बीफ मार्केटमधील व्यापाऱ्यांना जबरदस्तीने खंडणी मागणाऱ्या आणि वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना फरासखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

प्रविण उर्फ भैय्या प्रताप शिंदे (रा. कसबा पेठ) व साहिल रजपुत (रा. मंगळवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलिसांच्या तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक यशपाल सुर्यवंशी आणि कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी शिवजयंतीच्या नावाखाली बीफ मार्केटमधील व्यापाऱ्यांना खंडणी मागणारा व समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तोडफोड करणारा असे दोघे सराईत गुन्हेगार वारजे माळवाडी येथील माई मंगेशकर हॉस्पीटलजवळ य़ेणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी दिनेश भांदुर्गे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघां अटक केली.

प्रविण शिंदे याला खंडणी मागितल्याप्रकरणी तर रजपूत याला वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी अटक कऱण्यात आली आहे.

तडीपार गुंड अटकेत
शहरातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आलेले सराईत गुंड  शुभम भोसले व राजू शेख हे दोघे  तडीपारीच्या काळात शहरात आले असल्याची माहिती पोलीस नाईक शंकर कुंभार व सयाजी चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोलीस उपनिरीक्षक यशपाल सुर्यवंशी, कर्मचारी बापू खुटवड, केदार आढाव, दिनेश भांदुर्गे, अमोल सरडे, विकास बोऱ्हाडे, शंकर कुंभार, सयाजी चव्हाण, हर्षल शिंदे, महावीर वलटे. मोहन दळवी, आकाश वाल्मिकी, अमेय रसाळ, मयूर भोकरे यांच्या पथकाने केली.

You might also like