कार चालवताना ‘चुकून’ जोडप पोहचलं अमेरिकेत, मुलासह झाली अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटनमधील एका जोडप्यावर अवैधरित्या अमेरिकेत प्रवेश केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांना पकडण्यात आल्यानंतर त्यांनी गाडी चालवत असताना चुकून कॅनडामध्ये प्रवेश केल्याचे म्हटले आहे. मात्र त्यांना प्रवेश केल्यानंतर काही वेळातच अमेरिकेच्या सुरक्षा दलांनी कुटुंबाच्या अन्य सदस्यांसह अटक केली.

ब्रिटनचे जोडपे डेविड आणि ऐलीन कॉनर्स हे आपल्या मुलासह आणि कुटुंबासह कॅनडामध्ये सुट्ट्या घालवण्यासाठी आले होते. त्याचवेळी चुकून ते अमेरिकेच्या हद्दीत शिरले आणि त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता या जोडप्याने अमेरिकेत येण्यासाठी अर्ज केल्याची देखील माहिती समोर आली आहे. मात्र त्यांना याची परवानगी मिळाली नव्हती. त्यानंतर त्यांना पुन्हा कॅनडामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र कॅनडाने त्यांना परत घेण्यास नकार दिला. पोलिसांनी त्यांच्यावर अवैधरित्या घुसखोरी केल्याचा आरोप केला असून जोडप्याने मात्र आपण चुकून अमेरिकेत प्रवेश केल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, त्यांना सध्या अटक करण्यात आली असं त्यांना इमिग्रेशन डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र आपल्याला जनावरांसारखी वागणूक मिळत असल्याचा आरोप या जोडप्याने केला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी