अखेर ‘दया’ ने ओळखली गडबड…! ४० लाखांचे एमडी हस्तगत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘कुछ तो गडबड है दया’ हा सीआयडी मालिकेतील एसीपी प्रद्युमन यांचा संवाद आठवतोय ? पण खऱ्याखुऱ्या आयुष्यातील दया नायक या कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर आणि त्यांच्या टीमने वेळीच गडबड ओळखून ४० लाख रुपये किमतीचे एमडी मुंबईत हस्तगत करत दोघांच्या मुसक्या आवळल्या. इम्रान अब्दुल खालिद अन्सारी (३२) आणि अफझल हुसेन मुमताजली अन्सारी (३८) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अंधेरीत म्हाडा परिसरात आरोपी इम्रान अब्दुल खालिद अन्सारी आणि अफझल हुसेन मुमताजली अन्सारी दोघांचा गाशा दया नायक यांनी आवळला. त्यांच्याकडून १ किलो मेफेड्रीन हस्तगत करण्यात आली असुन अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत ४० लाख रुपये आहे. त्यांच्या एक मोटर सायकलही हस्तगत करण्यात आली असुन अधिक यातील इम्रान हा पश्चिम उपनगरातील एक मोठा अंमली पदार्थ विक्रेता असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त परमजीतसिंग दहीया आणि अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नायक आणि पोलीस निरीक्षक साळुंखे यांनी ही कारवाई केली असुन याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.