परळमधल्या क्रिस्टल टॉवरच्या १२व्या मजल्यावर लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

परळमधल्या १७ मजल्यांच्या क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्यावर लागलेल्या आगीत चौघ जणांचा गुदमरुन मृत्यु झाला असून आग लागल्यानंतर श्वास गुदमरल्याने आतापर्यंत १६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्यावर सकाळी ८़३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली़ शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. या आगीच्या धुरात १६ जण गुदमरल्यामुळे त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या आगीत चौघांचा मृत्यू झाला आहे.
[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’92d96a1b-a5d1-11e8-b45b-41c83b262034′]
अग्निशामक दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्यावर लागलेली ही दुस-या श्रेणीची आग आता तिस-यावरून चौथ्या श्रेणीची झाली आहे. त्यामुळे इमारतीतील लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीत मृत्यु पावलेल्यामध्ये एक महिला व एका वृद्धाचा समावेश आहे.

धूरचा त्रास झाल्याने त्यांचा मृत्यु झाला आहे़ या इमारतीत अजूनही काही जण अडकल्याची शक्यता लक्षात घेऊन अग्नीशामन दलाकडून शोध घेतला जात आहे.

१२ व्या मजल्यावर नुतनीकरणाचे काम सुरु होते.  त्यातून शॉर्ट सर्कीट होऊन ही आग लागल्याचे इमारतीत राहणाºयांनी सांगितले.

एका घरातून ती संपूर्ण १२ व्या मजल्यावरील सर्व फ्लॅटमध्ये पोहचली. त्यानंतर ती १३ व्या मजल्यावर पोहचली. इमारतीतील फायर फायरिंग सुरु नसल्याचे समोर आले आहे.